राहुरीतील वाळू तस्करांच्या घरात आढळली स्फोटके.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथे तडीपार करण्यात आलेल्या वाळू तस्कर माळी बंधूंच्या अटकेसाठी पोलिस प्रशासनाने किशोर माळी याच्या घराची झाडाझडती घेतली असता, घरामध्ये स्फोटक दारूगोळा सदृश पदार्थ आढळून आले आहे.


दारू सद‍ृश स्फोटक पदार्थ सापडले !
पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असताना पसार झालेल्या माळी बंधूंना पकडण्यासाठी श्रीरामपूरचे पोलिस उपअधीक्षक वाघचौरे व पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांचे पथक राहुरी भागात तैनात असून दोघांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने सामूहिकरित्या किशोर माळीच्या घरावर छापा टाकला. यावेळी बारागाव नांदूर येथील तरुणांसह टाकलेल्या छाप्यात पोलिसांना त्याच्या घरात दारू सद‍ृश स्फोटक पदार्थ सापडले आहेत. 

तिघांनाही जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपारीचे आदेश!
राहुरीतील बारागाव नांदूर येथील सुभाष साहेबराव माळी, किशोर साहेबराव माळी, गौतम साहेबराव माळी या तिघा भावांवर साधारण 25 ते 30 वाळू तस्करीसह अन्य गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी श्रीरामपूर विभागाचे उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी पुढाकार घेतला होता. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी तिघांनाही जिल्ह्यातून 2 वर्षांसाठी हद्दपारीचे आदेश जारी केले.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.