पारनेर तालुक्यात शिवसेना,राष्ट्रवादी कार्यकर्त्यांत राडा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :निवडणुकीत झालेल्या वादाच्या रागातून पारनेर तालुक्यातील पठारवाडी येथे शिवसेना व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या दोन गटात शुक्रवारी सायंकाळी जोरदार धुमश्‍चक्री झाली. त्यात 7 जण गंभीर जखमी झाले असून 29 जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


अंगावर बर्फाचे गोळे फेकण्यावरून वाद.
पठारवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी सामुदायिक विवाह सोहळा होता. विवाह लागल्यानंतर इतर विधी सुरू असताना एकमेकांच्या अंगावर बर्फाचे गोळे फेकण्याच्या कारणावरून वादाची ठिणगी पडली. दोन गटांत धक्‍काबुक्‍की तसेच किरकोळ मारहाण झाली. 

6 आरोपींना पोलिसांनी अटक
हा वाद मिळविण्यात आल्यानंतर तासाभराने दोन्ही गट तयारीनीशी समोरासमोर आले. दगड, विटांचा एकमेकांवर मारा करण्यात येऊन चॉपर, गज, लाकडी दांडके तसेच धारदार शस्त्रांसह दोन्ही गट एकमेकांना भिडले. एकमेकांच्या डोक्यात, तोंडावर, हात तसेच पायांवर लोखंडी गज, दांडके तसेच धारदार शस्त्रांनी प्रहार करण्यात आले. ही धुमश्‍चक्री सुरू असतानाच पारनेर पोलिसांना त्याची माहिती देण्यात आली. पोलिस घटना स्थळी आल्यानंतर 6 आरोपींना पोलिसांनी अटक करून त्यांना न्यायालयाने 11 मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.