गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा -डॉ.सुजय विखे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :योगेश राळेभात आणि राकेश राळेभात यांच्या हत्या या मनाला वेदना देणाऱ्या आहेत. या घटनेमुळे जामखेड तालुक्याची कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे चित्र समोर आले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. संपूर्ण तालुक्यात प्रभारी अधिकऱ्यांचेच राज्य 
योगेश राळेभात यांच्या मुलाचा शिक्षणाचा सर्व खर्च जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून करू, अशी ग्वाही डॉ. सुजय विखे यांनी दिली. डॉ. विखे यांनी जामखेड येथे योगेश आणि राकेश राळेभात यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केेले. डॉ. विखे म्हणाले, या घटनेला काही महिन्यांपासूनची पार्श्वभूमी आहे. येथील कायदा सुव्यवस्थेबाबत सातत्याने यापूर्वीही बोललेलो आहे. पण या संपूर्ण तालुक्यात प्रभारी अधिकऱ्यांचेच राज्य आहे. मागील तीन वर्षांत १२ पोलिस अधिकारी येथून बदलून जातात हे आश्चर्यकारक आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.