जनतेने नाकारल्याचे आत्मपरीक्षण करून गडाखांनी आता आमदारकीचे स्वप्न पाहू नये !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :माजी आमदार गडाखांकडे तालुक्याचा विकास करण्यासाठी अनेक मोठ्या संस्था आहे. त्यांनी आमच्या कामात खो घालण्यापेक्षा संस्थेच्या माध्यमातून तालुक्याचा विकास करावा. जनतेने आपल्याला का नाकारले, याचे आत्मपरीक्षण करून त्यांनी आता आमदारकीचे स्वप्न पाहू नये, असा सल्ला आमदार मुरकुटे यांनी दिला आहे.

विकासाबाबत बोलण्याचा अधिकार नाही.
नेवासे तालुक्याच्या विकासाबाबत बोलण्याचा अधिकार माजी आमदार शंकरराव गडाख यांना नाही, अशी टीका आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी बुधवारी पानेगाव येथे मुळा नदीवरील बंधाऱ्याचे जलपूजन करताना केली.
अध्यक्षस्थानी मुळाथडी पाणी समितीचे संचालक कृपाचार्य जाधव होते.

मागील पाच वर्षांचा कामाचा हिशेब द्यावा.
आमदार मुरकुटे म्हणाले, माजी आमदार गडाखांनी अगोदर मागील पाच वर्षांचा कामाचा हिशेब द्यावा. नुसती कागदोपत्री कामे दाखवू नको. पाच वर्षांत एकदाही त्यांनी बंधारे भरले नाहीत. जनतेने मला आमदार केल्यापासून सलग चार वर्षांपासून मी बंधारे भरत आहे. कायमस्वरूपी बंधारे भरण्यासाठी मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, जलसंपदामंत्री, पालकमंत्री, तसेच आमदार शिवाजी कर्डिले यांनी तरतूद केल्याचे आमदार मुरकुटे यांनी यावेळी सांगितले.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.