पोलिसांच्या दुटप्पी भूमिकेमुळे राष्ट्रवादी न्यायालयात दाद मागणार !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :एकीकडे पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांना अटक करण्यात आली, तर दुसरीकडे पोलिसांवर दगडफेेक करणाऱ्या एकाही शिवसेना कार्यकर्त्यावर कारवाई झालेली नाही. उलट, त्यांच्या विरोधात लावलेले कलम ३०८ (सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न) वगळण्यात आले. पोलिसांच्या या पक्षपातीपणाबद्दल राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झालेला आहे. 


कारवाई तर दूरच उलट कलम हटवले. 
केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर शिवसेना कार्यकर्त्यांनी पोलिसांवर, तसेच परिसरातील नागरिकांच्या घरावर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. हत्याकांडात मयत संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या मृतदेहासही पोलिसांना हात लावू दिला नाही. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह ६०० शिवसेना कार्यकत्यांवर गुन्हा दाखल केला. सदोष मनुष्यवधा प्रयत्न केल्याचे कलमही त्यांच्या विरोधात लावण्यात आले. परंतु शिवसेना कार्यकत्यांवर कारवाई तर दूरच उलट त्यांच्या विराेधातील ३०८ कलम हटवण्यात आले. 

तोडफोडीचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करावे
पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांना मात्र तत्काळ अटक करण्यात आली. पोलिसांनी तोडफोडीचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करावे, त्यात तोडफोड करताना जे दिसतील त्यांच्यावर कारवाई करावी, परंतु जे घटनास्थळी नव्हते, त्यांच्यावरही पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल केले. 

राष्ट्रवादी देखील न्यायालयात दाद मागणार !
पोलिसांच्या या पक्षपातीपणाबद्दल राष्ट्रवादीच्या कार्यकत्यांमध्ये सध्या तीव्र असंतोष दिसून येत आहे. आमदार संग्राम जगताप यांनी शांत राहण्याचे आदेश दिल्याने कार्यकर्त्यांवर तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करण्याची वेळ आली आहे. पोलिसांच्या या दुटप्पी भूमिकेबाबत राष्ट्रवादी देखील न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
Powered by Blogger.