एमआयडीसी तील सनफार्मा कंपनीतून 16 लाखाची पावडर चोरीला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर एमआयडीसी येथील सनफार्मा या कंपनीतून 16 लाख 29 हजार रूपयांची पावडर चोरीला गेल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी अज्ञात आरोपीविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात चोरीच्या गुन्हयाची नोंद करण्यात आली आहे. 


एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 
या बाबत सविस्तर माहिती अशी दि.24 एपिल रोजी रात्री 11.3 ते दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास एमआयडीसी येथील सनफार्मा कंपनीतील 16 लाख 29 हजार रूपये किंमतीची बॅच नंबर सी आर बी एन एफ 18059 क्रमांक असलेले टी एन पावडरचे एकूण 905 ग्रॅम वजनाचे 2 पाऊच अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याप्रकरणी फिर्यादी शंकर रामचंद्र लकडे (रा.शिव अभीषेक आठरे पाटील हायस्कूल,मेन गेट जवळ वडगाव गुप्ता ,सावेडी अ.नगर ) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरटयांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोरे हे करीत आहेत.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
Powered by Blogger.