हळदीच्या दिवशीच विहिरीत सापडला नवरदेवाचा मृतदेह,कुटुंबीयावर शोककळा 

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील रहिवासी सतीश वेणूनाथ वाकचौरे (वय 26) दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता झाला होता.त्याचा मृतदेह खिर्डी गणेश शिवारातील एका विहिरीत सापडला असून वाकचौरे कुटुंबीयावर शोककळा पसरली. 
मोबाईल बंद असल्याने तपासात अडचणी
त्याच्या कुटुंबीयांनी कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. तसेच सतीश ज्या गाडीवर बाहेर पडला ती गाडी व त्याचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले होते. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून त्याचा पोलिस व कुटुंबीय शोध घेत होते. मात्र, सतीशकडे असलेला मोबाईल बंद असल्याने तपासात अडचणी निर्माण होत होत्या. 

हळदीच्या दिवशीच सापडला मृतदेह. 
हळदीच्या दिवशी सदरची दुःखद घटना समोर आल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. काल दि. 5 मे रोजी सकाळी खिर्डी गणेश शिवारातील एका शेतातील विहिरीजवळ सतीशची दुचाकी काही जणांना दिसून आली. त्यांनी व्हॉटसअ‍ॅपवरील गाडी नंबर तपासाला असता तो सतीशच्या गाडीचा निघाला. तसेच शेजारील विहिरीत सतीशचे प्रेत तरंगत असताना आढळून आल्याने त्यांनी मयत सतीशच्या कुटुंबीयांना माहिती दिली. 

कुटुंबीयावर शोककळा पसरली. 
मयत सतीशचे कुटुंबातील सदस्य घटनास्थळी आले असता सदरचे प्रेत पाहून त्यांना धक्का बसला. सतीश हा त्याच्या आई व वडीलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यास दोन बहिणी देखील आहेत. ऐन लग्नाच्या आदल्या दिवशी वाकचौरे कुटुंबीयावर शोककळा पसरली असून रात्री पर्यंत पोलिस ठाण्यात कुठलीही तक्रार दाखल झाली नव्हती.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
Powered by Blogger.