खा.गांधींच्या घराचे अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी राष्ट्रपती, पंतप्रधान यांना पत्रव्यवहार !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- खासदार दिलीप गांधी यांच्या घराचे अतिक्रमण हटविण्यासाठी पिपल्स हेल्पलाईनच्या वतीने जनलोक कारसेवेची घोषणा करण्यात आली आहे. खा. गांधी यांनी स्वत:हून हे अतिक्रमण हटविणे अपेक्षित होते. रस्त्यावर अतिक्रमण करणे गंभीर गुन्हा असून, हे अतिक्रमण पाडण्यासाठी त्यांना संधी देवून कारसेवा जारी केली जाणार असल्याची माहिती अ‍ॅड.कारभारी गवळी यांनी दिली. 


अतिक्रमण अनेक वर्षापासून तसेच
आनंदधाम परिसरात खा. गांधी यांचे घर असून, हे अलिशान घर बांधताना रस्त्यावर अतिक्रमण झाल्याचे सर्वश्रुत आहे. हे अतिक्रमण मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने काढणे आवश्यक होते. मात्र राजकीय दबावापोटी हे अतिक्रमण अनेक वर्षापासून तसेच आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने या अतिक्रमणाची मोजणी करण्यात आली. मात्र सत्तेचा वापर करुन ही कारवाई टाळण्यात आली आहे. 

लोकप्रतिनिधींच्या वागण्याने कायद्यावरचा विश्वास उडाला !
सर्वसामान्यांना एक न्याय व लोकप्रतिनिधींना एक न्याय हे चुकीचे असून, हे अतिक्रमण पाडले गेले पाहिजे. भाजप सरकारदेखील सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करणार्‍या लोकप्रतिनिधीला अभय देत असल्याचा आरोप अ‍ॅड. गवळी यांनी केला आहे. लोकप्रतिनिधींच्या अशा वागण्याने सर्वसामान्यांचा कायद्यावरचा विश्वास उडाला आहे. 

राष्ट्रपती, पंतप्रधान व लोकसभेचे सभापती यांना पत्रव्यवहार 
सर्वसामान्यांची अतिक्रमणे काही तासात पाडली जातात. मात्र अनेक वर्षापासून या अतिक्रमणाचा प्रश्न प्रलंबित आहे. हे अतिक्रमण हटविण्यासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान व लोकसभेचे सभापती यांना पत्र पाठविण्यात आले असून, हे अतिक्रमण न निघाल्यास लोकांच्या माध्यमातून जनलोक कारसेवा जारी करुन पाडण्याचा इशारा संघटनेच्या वतीने प्रसिध्दीपत्रकाद्वारे देण्यात आला आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
Powered by Blogger.