राधाकृष्ण विखे पाटील महाराष्‍ट्र राज्‍याचे मुख्यमंत्री व्हावेत !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी देशात जे कुणाला जमले नाही ते करून दाखवले. आयुष्यभर अथक परिश्रम घेऊन शेतकरी आणि सामान्यांना समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. शेतकरी सुखी तर जग सुखी हा विचार त्यांनी मांडला.प्रवरानगर येथे प्रवरा उद्योग समूहाच्यावतीने पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंती समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. 


अभ्यासक्रमात शेतीचा अभ्यासक्रम आणण्याची गरज
पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्य कर्तृत्वाला अध्यात्माची जोड असल्यानेच हे घडू शकले असे सांगताना, शेतीला चांगले दिवस येण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात शेतीचा अभ्यासक्रम आणण्याची काळाची गरज असून शेती आणि शेतकरी याना समृद्ध बनवण्याची क्षमता विधानसभेतील विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात असल्याने ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत असे प्रतिपादन दिंडोरी प्रणित श्री.स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वरचे प्रमुख गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांनी काढले.

शेतकऱ्याला आरसा दाखवण्याची वेळ
गुरुमाऊली म्हणाले, बाळासाहेब विखे पाटील कार्यसम्राट होते. परिसराचं त्यांनी सोनं केलं.शेती,शेतकरी,पाणी आणि शिक्षण यासाठी त्यांनी जीवनभर परिश्रम घेतले.शेतीद्वारे सर्वांगीण विकास हि त्यांची मूलभूत कार्यपद्धती होती.अध्यात्मशक्तीच्या पाठबळावर त्यांचे जीवन यशस्वी झाले. आज शेतकऱ्याला आरसा दाखवण्याची वेळ आली आहे.

चित्र बदलण्यासाठी खूप काम करावे
जमिनीचे लहान लहान तुकडे झाल्याने त्यातून जगणे अवघड होऊन बसले आहे. शेतीबद्दल अनास्था निर्माण झाली आहे.शेतकऱ्यांपुढे अनेक आव्हाने उभी आहेत. मुलांचे विवाह होत नाहीत, त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत. हे चित्र बदलण्यासाठी खूप काम करावे लागेल. आधुनिक शेतीसाठी प्राथमिक शिक्षणात शेतीचा अभ्यासक्रम आणावा लागेल. शेती आधारित लघु उद्योग उभे करावे लागतील.

ना.विखे पाटील यांनी कृषीमंत्री म्हणून चांगले काम केले
नवी पिढी काटक आणि निरोगी असण्यासाठी हे गरजेचे आहे. ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी नाशिक मध्ये सात-आठ वर्षांपूर्वी कृषी प्रदर्शन भरवून रोपटे लावले आता ते मोठे प्रदर्शन झाले आहे. ना.विखे पाटील यांनी कृषीमंत्री म्हणून चांगले काम केले. स्वयंरोजगार, दूध प्रक्रिया उद्योग यांच्यासाठी अधिवेशनात चर्चा घडवून आणावी. बाळासाहेबांसारखीच शेती,शेतकरी आणि ग्रामीण विकास यासाठी काम करण्याची त्यांची धडपड आहे. त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं अशी आपली इच्छा आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.