आमदार मुरकुटे राहुरीच्या लोकप्रतिनिधींच्या दावणीला बांधले !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :चार वर्षांपासून राहुरी तालुक्यातील बंधारे तुडुंब भरत आहेत. मात्र नेवासा तालुक्यातील बंधारे कोरडे आहेत. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना नेवाशातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे काहीही देणेघेणे नाही. ते राहुरीच्या लोकप्रतिनिधींच्या दावणीला बांधले आहेत. मुरकुटे राहुरीचे आमदार नसून त्यांना नेवासा तालुक्याचे आमदार असल्याचा विसर पडला असल्याची टिका शेतकरी संघटनेचे सदस्य त्रिंबक भदगले यांनी एका पत्रकान्वये केली आहे.

चार वर्षात काय दिवे लावले ?
भदगले यांनी पत्रकात म्हटले आहे,आमदार मुरकुटे सत्तेत आहेत. त्यांनी चार वर्षात काय दिवे लावले हे सांगण्याऐवजी ते फक्त जनतेची दिशाभूल करीत आहेत. मुरकुटे फक्त त्यांची जुनीच कैसेट तालुक्यात वाजवत आहेत. प्रत्येक ठिकाणी भाषणात आरोप करण्यात करण्यात मुरकुटे दंग आहेत.

ती कर्जमाफी कोठे गेली? 
तालुक्यातील जनतेच्या प्रश्नावर ते गप्प आहेत. जिल्ह्यातील दुसऱ्या तालुक्यात कोट्यवधी रुपयांचे पिक विमा अनुदान आले असताना नेवासा तालुक्यात पिक विमा अनुदान का आले नाही? गावागावात कर्जमाफीचे फ्लेक्स लावून स्वतःची पाठ थोपटून घेतली ती कर्जमाफी कोठे गेली?

सर्वसामान्यांची पिळवणूक कोणाच्या सांगण्यावरून ?
हे आता उघड गुपित असून तालुक्यातील पोलीस ठाण्यात अवैध व्यवसायिकाना सलाम तर सर्वसामान्यांची पिळवणूक कोणाच्या सांगण्यावरून होत आहे हे जनतेला कळाले असून फक्त वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी राजकीय सेटलमेंट केली जात असल्याचा आरोप भदगले यांनी पत्रकात केला

जनता मुरकुटे यांच्या पोपटपंचीला कंटाळली
शेतकरी संघटनेने यापूर्वी मुळा साखर कारखान्यावर मोर्चा नेलेला आहे.गेल्या सहा वर्षांपासून आमदार बाळासाहेब मुरकुटे विकासाच्या मुद्द्यावर न बोलता फक्त गडाख विरोधी सूर काढत आहेत. तालुक्यातील जनता मुरकुटे यांच्या पोपटपंची ला कंटाळली असून आमदार मुरकुटे यांना जनतेचे चे प्रश्न महत्त्वाचे आहे की आरोप-प्रत्यारोप यामध्ये त्यांना रस आहे. याचा खुलासा त्यांनी करावा असे आवाहन भदगले यांनी केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.