फडणवीस साहेब आम्हाला बेशिस्त प्राध्यापक पालकमंत्र्यांपेक्षा शिस्त लावणारा गुरूजी पाहिजे !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर जिल्ह्यातील कोपर्डी, पांगरमल, केडगाव दुहेरी हत्याकांड, जामखेड दुहेरी हत्याकांड अशा घटनांमुळे जिल्ह्याचे नाव बदनाम होत आहे. जिल्ह्याला कायदा व सुव्यवस्थाबाबत शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे.नगर हे बिहार होत असल्याच्या बोंबा ठोकत शहराची बदनामी सुरू आहे. 

पालकमंत्र्यांचा ‘वचक’ राहिला नाही ! 
जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांचा जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच अन्य कोणत्याच जबाबदार अधिकार्यांवर वचक राहिलेला नाही. शहरात कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. सलग होणार्या घटनांमुळे नगर जिल्ह्याचे नाव बदनाम झाले आहे. प्राध्यपक असलेल्या पालकमंत्र्यांचा ‘वचक’ राहिलेला नाही. त्यापेक्षा जिल्ह्याला शिस्त लावणारा गुरूजी बरा.. अशा शब्दात पालकमंत्र्यांची तक्रार मनसेचे नितीन भुतारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

प्राध्यापक पालकमंत्र्यांना कार्यमुक्त करा.
तुमच्या भाजपने दिलेला बेशिस्त प्राध्यापक पालकमंत्री जिल्ह्याला नकोय, अशी भावना समस्त नगरकरांची झाली आहे. बदनामी सोसावी लागलेल्या घटनांचे प्रायश्चित म्हणून मुख्यमंत्री या नात्याने प्राध्यापक पालकमंत्र्यांना कार्यमुक्त करा अशी मागणी भुतारे यांनी पत्रात केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.