जामखेड हत्याकांडातील मास्टरमाइंडला अटक !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी उल्हास मानेला आज सकाळी पोलिसांनी सापळा रचून कर्जत तालुक्यातील एका शेतात अटक केली,या प्रकरणांमध्ये आत्तापर्यंत पोलिसांनी अटक केलेल्यांची संख्या नऊ झाली आहे.


गेल्या आठवड्यात शनिवारी जामखेडमध्ये योगेश राळेभात व राकेश राळेभात या दोन तरुणांची हत्या झाली,
त्या नंतर तो फरार झाला होता, पोलिसांनी ९ पथके विविध ठिकाणी आरोपींचा शोध घेण्यासाठी पाठवली होती.
हत्याकांडानंतर माने फरार होता. मात्र नातेवाईकांच्या संपर्कात असल्याचं आढळून आल्यानं सापळा रचून त्याला अटक करण्यात आले.

गुन्ह्याचा उलगडा होण्याची शक्यता.
दुहेरी हत्याकांडाचा तपास लागण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली होती. आज आरोपी मानेला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्याकडून या घटनेचा उलगडा होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. माने याला न्यायालयामध्ये हजर केले जाणार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.