विशाल कोतकरला १५ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपी विशाल कोतकर याला न्यायालयाने १५ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. केडगाव येथे ७ एप्रिल रोजी शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. 


५ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी 
या घटनेनंतर केडगावमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोिलसांनी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात पोलिसांनी आमदार संग्राम जगताप यांच्यासह दहा जणांना अटक केली होती. या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या विशाल कोतकरची पोलिस कोठडीची मुदत शुक्रवारी संपली हाेती. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने १५ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
-------------------------------
Blogger द्वारा समर्थित.