श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच नातेवाईकांत मारहाण


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आमच्याविरुद्ध पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद का दिली?, अशी विचारणा करीत पती शहाजी बबन खेतमाळीस याने फिर्यादी पत्नी वर्षा खेतमाळीस (वय २९, रा. श्रीगोंदा) हिच्यासह नातेवाइकांना पोलिस स्टेशनच्या आवारातच मारहाण केली.

पोलिस म्हटले की लोकांची पळती भुई थोडी व्हायची, परंतु अलीकडे लोकांना कसलेच भान उरलेले नाही. कुठे भांडण सुरू असले किंवा चुकीच्या गोष्टी होत असल्या त्यावेळी फक्त पोलीस आले म्हणले तरी लोकांची पळापळ सुरू होते. पण काहीजण एवढे निर्ढावलेले आहेत की, भांडण करताना आपण कुठे आहोत याचेदेखील त्यांना भान राहात नाही.याचाच प्रत्यय श्रीगोंदा पोलीस ठाण्यात पाहायला मिळाला

यातील एक व्यक्ती सेवानिवृत्त पोलीस
तक्रार द्यायला आलेले नातेवाईक ठाणे अंमलदारासमोरच एकमेकांना भिडले. पोलिसांनी तात्काळ या भांडखोर नातेवाईकांना ताब्यात घेतले. परंतु पोलीस ठाण्यात सासरा,जावई,मेव्हना यांच्यात झालेल्या या मारामारीची सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली. विशेष म्हणजे यातील एक व्यक्ती सेवानिवृत्त पोलीस आहे.

ठाणे अंमलदारासमोरच मारहाण.
घरगुती वाद झाल्यामुळे एक महिला तिच्या नातेवाईकांसोबत पती विरोधात तक्रार देण्यासाठी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आली होती. त्याचवेळी त्या महिलेचा पती देखील तक्रार देण्यासाठी आला. तेव्हा त्याला तेथे पाहून संतप्त झालेल्या या महिलेच्या नातेवाईकांनी ठाणे अंमलदारासमोरच त्याला मारण्यास सुरुवात केली. पोलिसांनी तात्काळ सर्वाना ताब्यात घेतले. 

शहरात चर्चा रंगली !
महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून तिचा पती व इतर काही नातेवाईकांविरोधात आधी दिलेल्या तक्रारीवरून मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकाराबाबत रात्री उशिरा कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू होती. मुलीला मारहाण करणाऱ्या जावायला, मेव्हूना व सासऱ्याने केलेल्या मारहाणीची शहरात चांगलीच चर्चा रंगली होती.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
--------------------------------
Powered by Blogger.