पारनेरमध्ये तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर तालुक्यातील गणेशवाडी (रायतळे ) येथे दि .४ रोजी सकाळी ७ वाजण्यापूर्वी अक्षय हरीभाऊ गायकवाड (वय - २० मूळ राहणार सावेडी , अ.नगर) सध्या राहणार गणेशवाडी ( रायतळे ) येथील या तरूणाने शेतातील आंब्याच्या झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. 


आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ट 
त्याने कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे मात्र समजू शकले नाही. भीमा विठोबा माळी (रा.गणेशवाडी) यांच्या खबरीवरून सुपा पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे.कॉ. बाबासाहेब अकोलकर करीत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.