महसूलच्या पथकाला धमकावत वाळूतस्करांनी पळवले ८ ट्रॅक्टर.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पुणतांबे येथे गोदावरी नदीपात्रात नायब तहसीलदारांच्या पथकाला ६० ते ७० जणांनी अडवून वाळूचे पकडलेले आठ ट्रॅक्टर पळवून नेले. या प्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाईच्या नोटिसा तहसीलदारांच्या आदेशाने पोलिसांनी बजावल्या आहेत.

६० ते ७० जणांचा जमाव या पथकावर आला धावून.
ही घटना बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास पुणतांबे नदीपात्राजवळ इदगाह मैदान परिसरात घडली. तहसील अधिकाऱ्यांनी जप्त केलेली वाळू चोरून नेत असल्याची माहिती मिळाल्याने नायब तहसीलदार राहुल कोताडे व अन्य चार जणांचे पथक तेथे गेले असता ८ ट्रॅक्टर जप्त केलेली वाळू भरत असल्याचे निदर्शनास आले. यातील ४ ट्रॅक्टर पकडले, तर चार पळून गेले. पंचनामा चालू असताना ६० ते ७० जणांचा जमाव या पथकावर धावून आला. महसूल पथकाभोवती कडे करून धमकावत पकडलेले ४ ट्रॅक्टर पळवून नेण्यात आले.

ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्यांमध्ये यांचा समावेश. 
गणेश रमेश पवार, रमेश पवार, बंटी सोमवंशी, किरण मोटकर, राहुल डोखे, दादा डोखे, दिगंबर पवार व त्यांच्या ४० ते ५० साथीदारांच्या समावेश आहे. तहसीलदार माणिक आहेर यांनी प्रतिबंधक कारवाई फौजदारी प्रक्रिया कलम १०७ नुसार कारवाई करण्याच्या नोटिसा राहाता पोलिस निरीक्षकांमार्फत संबंधितांना बजावण्याचा आदेश देण्यात आला.

वाळूतस्करांवर कठोर कारवाईची मागणी. 
गोदावरी नदीपात्रातील डवनगाव हद्द वैजापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर वाळूतस्करी होत असून तिचा बंदोबस्त करण्यासाठी तसा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे. हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली. वाळूतस्करांवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.