श्रीगोंदा पोलिसांच्या धडक कारवाईत चार लाखांचा मुद्देमाल जप्त.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी अवैध व्यवसायावर जोरदार कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पोवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवार दि.१मे रोजी एक लाख रूपये किमतीचा गुटखा व अडीच लाख रुपये किमतीची इंडिका गाडी असा साडेतीन लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. तसेच पंचवीस हजार रुपयांची देशी विदेशी बनावटीची दारूसह एकूण चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.याबाबत सविस्तर असे की, महाराष्ट्र दिनानिमित्त ड्राय डे असूनही, शहरातील हॉटेल स्वागत या ठिकाणी दारुविक्री सुरू असल्याचे समजल. त्यावर पोलिसांनी झडती घेतली असता तेथे दारुविक्री सुरू होती.त्यामुळे पोलिसांनी येथील १५ हजार रुपयांची देशी विदेशी दारू जप्त करून सुभाष पोपट आनंदकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

साडेनऊ हजाराची देशी विदेशी दारू जप्त 
तसेच भानगाव येथील हॉटेल राजदरबार वर छापा टाकून साडेनऊ हजाराची देशी विदेशी दारू जप्त करून, अवैध दारू विक्री केल्याप्रकरणी संतोष जयवंत टकले, योगेश बबन कुदांडे या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तीस हजार रुपये किमतीचा गुटखा जप्त 
तसेच बाबूर्डी रोडवर एका इंडिका गाडी एमएच १२ बीव्ही ४०८३ यातून अवैध गुटखा विक्रीसाठी चालवला असल्याची माहिती मिळाली.त्यानुसार पोवार यांनी सदर गाडीची झडती घेतली असता यात तीस हजार रुपये किमतीचा गुटखा मिळाला त्यानंतर रात्रीच्या वेळेस सहायक पो.निरीक्षक निलेश कांबळे व त्यांच्या पथकाने रात्री उशिरा ७० हजार रूपयांचा गुटखा जप्त केला. असा एकूण एक लाख रुपये किंमतीचा गुटखा व इंडिका गाडी असा साडेतीन लाखांचा मुद्देमालासह सोहेल अनवर शेख रा.श्रीगोंदा याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

एकाच दिवशी ४५ वाहनांवर दंडात्मक कारवाई 
श्रीगोंदा पोलिसांनी दि.१ मे रोजी दुपारी नाकाबंदी करत, बेशिस्त गाडी चालवणे, वाहातुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्या ४५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून, सुमारे दहा हजार, शंभर रुपयांचा दंड वसूल केला. या कारवाईची देखील चांगलीच चर्चा रंगली असून. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.