जिल्‍हयातील 77 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्‍य निवडणूक आयोगाने अहमदनगर जिल्‍हयातील माहे जून 2018 ते सप्‍टेंबर 2018 या कालावधीत मुदत सुंपणा-या 77 ग्रामपंचायतीच्‍या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 


या निवडणूकीसाठी नामनिर्देशन पत्र स्‍वीकारण्‍याचा कालावधीत दिनांक 7 ते 12 मे, 2018 या कालावधीत सकाळी 11 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यंत आहे. नामनिर्देशनपत्र छाननी दिनांक 14 मे 2018 रोजी सकाळी 11 वाजल्‍यापासून छाननी संपेपर्यत. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्‍याची अंतिम दिनांक 16 मे 2018 रोजी दुपारी 3 वाजेपर्यत असून दुपारी 3 वाजेनंतर निवडणूक चिन्‍ह नेमून देण्‍याचा तसेच अंतिमरित्‍या निवडणूक लढविणा-या उमदेवारांची यादी प्रसिध्‍द करण्‍यात येईल. 

28 मे 2018 रोजी मतमोजणी
आवश्‍यक असल्‍यास मतदानाचा दिनांक 27 मे 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत राहील. दिनांक 28 मे 2018 रोजी मतमोजणी होईल. मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्‍हाधिका-याच्‍या मान्‍यतेने तहसीलदार निश्चित करतील त्‍यानुसार राहील. तसेच निवडणूकांचा निकाल प्रसिध्‍द करण्‍याचा अंतिम दिनांक 29 ते 31 मे 2018 राहील असे जिल्‍हाधिकारी, अहमदनगर यांनी एका पत्रकान्‍वये कळविले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.