किशोर डागवाले कोणत्या पक्षाचे आहेत हे त्यांनाच माहिती नाही !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- प्रत्येक निवडणुकीत पक्ष बदलणारे, तसेच पक्ष बदलून महापौर निवडणुकीत मलिदा खाणाऱ्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. किशोर डागवाले कोणत्या पक्षाचे आहेत हे त्यांनाच माहिती नाही. आपल्या कर्तृत्वाला 'सरडा' लाजेल असे कृत्य करणाऱ्यांनी नैतिकतेच्या गप्पा मारू नयेत. 'खाऊदाराला' बाजू मांडण्यासाठी पक्षाचा एकही विद्यमान नगरसेवक व पदाधिकारी मिळाला नसल्याने दलबदलू व्यक्तीला बाजू मांडावी लागली, अशी टीका शिवसेनेने शुक्रवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली. 


प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनावर शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक दहिफळे, उपशहरप्रमुख सचिन शिंदे, संतोष गेनाप्पा, शरद कोके यांची स्वाक्षरी आहे. निवेदनात म्हटले आहे की, शिवसेनेत अनेकवेळा फूट पडली, तसेच काेट्यवधींची अामिषे आली, परंतु पक्षाशी कधीही प्रतारणा केली नाही. 

डागवलेंनी कार्यालयाचे रंग, नेत्यांचे फोटो व झेंडे बदलले !
 प्रत्येकवेळी महापौर निवडणूक घोडेबाजारात जास्त हरभरा खाणारा घोडा असा नावलौकिक असणाऱ्यांनी पुढच्या निवडणुकीत नवीन घर शोधलेले असेल. अनिल राठोड नव्हे, तर शिवसेनेचा कार्यकर्ताच आपल्या विरोधात खासदारकीसाठी लढण्याची हिंमत करेल. 

पाठ थोपटून घेण्याची गरज नाही.
नगर रेल्वे, सौर ऊर्जा, प्रमुख मार्गासाठी निधी आणल्याचा डंका पिटवला जातो.पण हा निधी देणे सरकारला क्रमप्राप्त आहे. त्यासाठी पाठ थोपटून घेण्याची गरज नाही. लोढा हाईट्सबाबत त्यांचे म्हणणे बालिशपणाचे आहे. गाळा बळकावला असता, तर गाळेधारक व मालकाने कारवाई केली असती. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.