भरवस्तीत तलवार घेऊन फिरणाऱ्या युवकास अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शहरातील मध्यवस्तीत असलेल्या लक्ष्मीनगर परिसरात हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या एका व्यक्तीस पोलिसांनी तलवारीसह पकडले. त्याच्याविरूद्ध जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन, भारतीय हत्यार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी दिली. सागर हरिभाऊ सोमवंशी (२७, रा. लक्ष्मीनगर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. . याबाबत हवालदार सुरज अग्रवाल यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना जाधव यांनी सांगितले की, आज सकाळी सव्वाबारा वाजेच्या दरम्यान गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक व्यक्ती लक्ष्मीनगर भागात एकविरा किराणा दुकानाच्या पाठीमागे सार्वजनिक ठिकाणी आपल्या हातात एक लोखंडी तलवार घेऊन फिरत आहे.

लोखंडी तलवार जप्त
सहायक पोलीस निरीक्षक विकास थोरात व त्यांच्या सहकार्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून घटनेची खात्री केली असता सागर सोमवंशी हा हातात तलवार घेऊन फिरताना दिसून आला. त्यावर तत्काळ छापा घालून आरोपीस पकडण्यात आले आहे. आरोपीकडून एक हजार रुपये किमतीची स्टीलचे पाते असलेली लोखंडी तलवार जप्त केली. या बाबीवरून आरोपी विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलत जाधव करीत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.