वेश्या व्यवसायावर पोलिसांची कारवाई, पीडित महिलेची सुटका.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर शहरात मध्यवस्तीत सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पोलिसांनी गुरुवारी कारवाई करत एका पीडित महिलेची सुटका केली. वेश्याव्यवसाय चालवणाऱ्याला अटक केली असून त्याच्याविरोधात पिटा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मेनरोडवर वर्मा रेडिआे दुकानाच्या पहिल्या मजल्यावर दुकानमालक कैलास सुरेश वर्मा हा ग्राहकांना महिला, मुली पुरवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. निरीक्षक गोकुळ आैताडे यांनी गुरुवारी रात्री बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. दुकानाच्या पहिल्या मजल्यावर एक महिला आणि मुलगी असल्याची खात्री झाल्यावर बनावट ग्राहकाच्या इशाऱ्यावरुन पोलिसांनी छापा टाकला. 

पिटा कायद्यांतर्गत कारवाई 
'गुंजाळ काका' या नावाची व्यक्ती या व्यवसायासाठी संगमनेर शहरात महिला व मुली पुरवत असल्याची माहिती पोलिसांच्या तपासात पुढे आली आहे. तो फरार आहे. पोलिस शिपाई सचिन उगले यांच्या तक्रारीवरुन आरोपी कैलास वर्मा याच्याविरोधात पिटा कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. शुक्रवारी वर्मा याला न्यायालयाने ९ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पीडित महिलेला सुधारगृहात पाठवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

लॉजमध्ये सर्रास वेश्याव्यवसाय 
शहरात अन्य काही ठिकाणी आणि लॉजमध्ये सर्रास वेश्याव्यवसाय चालतो, पण त्याकडे पोलिसांची नजर जात नाही. गुरुवारच्या कारवाईत पोलिसांनी थेट कुंटणखान्यावर छापा दाखवत आरोपीविरोधात 'पिटा'ची कारवाई केली. संगमनेरमध्ये या कायद्यान्वये ही पहिलीच कारवाई ठरली. कारवाईबाबत पोलिसांनी मोठी गोपनीयता बाळगली होती.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.