दगड फेकून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मधुबन कॉलणी येथील एका जणास मागील भांडणाच्या कारणावरून दगड फेकून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, गणेश रामदास चक्राळ (वय ५५) यांचे मधुबन कॉलणी येथे घर असून त्यांचे फैजान कलिम बागवान याच्याशी काही महिन्यांपूर्वी वाद झाले होते.


रविवार दि. २९ रोजी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास खिडकीची काच फोडून चक्राळ यांच्या दिशेने तीन मोठे दगड फेकून मारले. मात्र आवाजाने चक्राळ हे जागे झाल्याने त्यांनी ही दगडे चुकविली. यावेळी बागवान याने तू आता वाचला मात्र तुला जिवंत सोडणार नाही, एका-एकास ठार मारून टाकेल असे म्हणत चक्राळ यांना शिवीगाळ करत धमकी दिली. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो. स. ई. संजयकुमार सोने हे करीत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.