न्यायालयाच्या आदेशानुसार शिर्डीतील कॉम्पलेक्स पाडण्यास सुरुवात !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-मनमाड महामार्गा लगत असणारे शिर्डीतील खंडोबा शॉपींग कॉम्पलेक्स न्यायालयाच्या आदेशान्वये पाडण्यास शिर्डी नगरपंचायतने सुरुवात केली असुन सदरची इमारत पाडुन जमिनदोस्त केली जाणार आहे.


शिर्डी नगरपंचायतने सन २००५ साली नगर-मनमार महामार्गालगत खंडोबा शॉपींग कॉम्पलेक्स बांधले होते. याविरोधात याचिकाकर्त्यांच्या वतीने औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल करण्यात आली होती.शिर्डी नगररपंचायत व ठेकेदार यांनी राज्य महामार्गाची नियंत्रण रेषा यामध्ये आलेल्या भुभागाचा वापर, विल्हेवाट, विक्री करू नये तसेच इमारत पूर्णत्वाचा दाखला देऊ नये असे आदेश खंडपीठाने दिले होते. 

सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हाधिकारी यांनी जानेवारी २०१७ मध्ये केलेल्या संयुक्तिक पंचनाम्यानुसार नगरपंचायतने बांधलेले शॉपिंग कॉम्प्लेक्स महामार्गाच्या मध्यभागापासून २०.२३ मीटर अंतरावर आहे. आणि २००१ च्या अधिसुचनेनुसार नियंत्रण कक्ष रस्त्याच्या मध्याभागापासून ३७ मीटर अंतरावर आहे. हे व्यापारी संकुल २००५ साली बांधण्यात आले होते. त्याच्या बांधकामास खंडपीठात आव्हान देण्यात आले होते

...तरीही शॉपिंग कॉम्प्लेक्सचे सर्व गाळे वापरात
अधिसूचनेनुसार नागरी भागातील इमारत रेषा राज्य महामार्ग रस्त्याच्या मध्य भागापासून २० मीटर अंतरावर आहे. रस्त्याच्या मध्य भागापासून नियंत्रण कक्ष ३७ मीटर अंतरावर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांनी जानेवारी २०१७ मध्ये केलेल्या संयुक्त पंचनाम्यानुसार नगर परिषदेने उभारलेले कॉम्प्लेक्स, रस्त्याच्या मध्य भागापासून २०.२३ मीटर अंतरावर आहे. म्हणजे ती संपूर्ण इमारत अवैधपणे बांधण्यात आली आहे. तरीही आजपर्यंत शॉपिंग कॉम्प्लेक्सचे सर्व गाळे वापरात आहेत. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.