आ.कांबळे, नगराध्यक्ष आदिक व सभापती पटारे यांना धक्काबुक्कीप्रकरणी गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीरामपूर चे आमदार भाऊसाहेब कांबळे, नगराध्यक्ष अनुराधा आदिक व पंचायत समिती सभापती दीपक पटारे यांना झालेल्या धक्काबुक्कीप्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अकराजणांना अटक करण्यात आली. 



सागर दुपाटी, अजय धाकतोडे, नीलेश बोरावके, कृष्णा पुंड, सिद्धार्थ फंड, युवराज फंड, गोपाल लिंगायत, नीलेश कुंकुलोळ, सुरेश धोत्रे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. संत गंगागिरी महाराज भक्त मंडळ व तुळजा फाउंडेशनच्या वतीने थत्ते मैदानावर आयोजित श्रीमद् भागवत सप्ताहानिमित्त बुधवारी सायंकाळी महंत रामगिरी महाराजांची मिरवणूक काढण्यात आली होती. 

११ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला
आमदार कांबळे, आदिक व पटारे हे त्यांच्या समर्थकांसह मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी श्रीराम मंदिर चौकात थांबले होते. कांबळे, आदिक, पटारे महाराजांना पुष्पहार घालण्यासाठी पुढे आले असता त्यांना मज्जाव करण्यात येऊन धक्काबुक्की व शिवीगाळ करण्यात आली. पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांनी हस्तक्षेप केल्याने वाद मिटून मिरवणूक शांततेत पार पडली. रात्री उशिरा पोलिस शिपाई सतीश गोरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिल्यानंतर ११ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला

------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.