दगडफेक प्रकरण जगताप,गिरवलेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पोलिस अधिक्षक कार्यालय दगडफेक प्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी विकी जगताप व ओंकार गिरवले यांनी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमंगले यांचेसमोर सुनावणी होऊन जगताप व गिरवलेंचा अर्ज फेटाळण्यात आला. अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल 
केडगाव उपशहर प्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची हत्या झाली. दरम्यान आ. संग्राम जगताप यांना सायंकाळी पोलिस अधिक्षक कार्यालयात बोलावण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी करून दगडफेक केली. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी विकी दादासाहेब जगताप व ओंकार कैलास गिरवले यांनी अर्ज दाखल केला होता. यावर सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकिल ॲड. अनिल डी. ढगे यांनी युक्तीवाद केला. 

सीसीटिव्ही फुटेजमध्ये आरोपीचा समावेश. 
हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून यामध्ये सीसीटिव्ही फुटेजमध्ये आरोपीचा तेथे समावेश असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. त्यामुळे आरोपींना तपासकामी पोलिस कोठडी मिळणे आवश्यक आहे. तर आरोपींच्यावतीने ॲड. जय भोसले यांनी प्रखर युक्तीवाद करताना सरकार पक्षाचे मुद्दे खोडून काढले. या प्रकरणी दाखल फिर्यादीमध्ये विकी जगताप, ओंकार गिरवले यांची नावे नसल्याचे नमूद केले. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून सदरचा अर्ज फेटाळला.

------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.