महिला सरपंचांचा विनयभंग,सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या मतदारसंघातील लोणीखुर्द येथील ग्रामसभेत झालेल्या हाणामारीच्या घटनेने गावातील तणाव अद्याप निवळला नसताना या गावच्या महिला सरपंचांनी ६ ग्रामस्थांविरोधात विनयभंगाची फिर्याद ठोकल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुन्हा दाखल करून घेत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. 


महाराष्ट्र दिनाच्या दिवशी लोणीखुर्द गावात विशेष ग्रामसभा सरपंच मनीषा हरिभाऊ आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ग्रामपंचायत इमारतीमधील सभाग्राहाला लोणी गावचे दैवत आणि माजी आमदार चंद्रभान दादा घोगरे यांचे नाव देण्याचा एकमुखी ठराव ग्रामसभेने मंजूर केला; मात्र, त्यास सरपंच बाईचे पती हरिभाऊ आहेर यांनी विरोध केला. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले.

घटनेने लोणी गावात दोन दिवस तणाव
संतप्त ग्रामस्थांनी घोगरे यांच्या नावाला विरोध करणाऱ्याला आणि त्याच्या सूत्रधाराला बदडून काढले. सत्तारूढ आणि विरोधी गटांनी एकमेकांवर पोलिसात केसेस दाखल केल्या. या घटनेने लोणी गावात दोन दिवस तणाव निर्माण झाला. पोलिसांनी तळ ठोकला. ग्रामसभेत झालेल्या हाणामारीच्या घटनेने गावातील तणाव अद्याप निवळला नसताना या गावच्या महिला सरपंचांनी ६ ग्रामस्थांविरोधात विनयभंगाची फिर्याद ठोकल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल 
महिला सरपंचांच्या फिर्यादीवरून माजी सरपंच जनार्दन घोगरे, एकनाथ घोगरे, शरद आहेर, आबासाहेब घोगरे, गौतम आहेर, श्रीकांत मापारी या सहा जणांविरुद्ध लोणी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे तपास करीत आहेत. गुरुवारी संध्याकाळपर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती.

------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.