मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे : ना. राधाकृष्ण विखे.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. मात्र मराठा समाजाला आरक्षण देताना इतर समाजांना कायद्यानुसार मिळालेल्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये, असेही त्यांनी म्हटले आहे. 


अहमदनगर येथे महाराष्ट्र मागासवर्ग आयोगाने मराठा आरक्षणासंदर्भात विविध संस्था, संघटनांची बाजू ऐकून घेतली. विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील एका सविस्तर निवेदनाच्या माध्यमातून आयोगापुढे आपली भूमिका मांडली. 

मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज 
आयोगासमोर बोलताना विरोधी पक्षनेते ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरज व्यक्त करताना समाजातील विविध प्रश्नांचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले. शेतकरी, शेतमजूर, महिला आणि युवकांपुढे असलेली आर्थिक, सामाजिक आव्हाने विचारात घेता शासनाने तातडीने आरक्षणाचा निर्णय करण्याची मागणी त्यांनी केली. 

तोवर सरकारची प्रामाणिकता स्पष्ट होणार नाही 
विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत आपण सरकारकडे पाठपुरावा केला. मराठा संघटनांनी काढलेल्या मोर्चांमुळे सरकारने आता आयोगाच्या माध्यमातून आरक्षणाच्या मागणीबाबत हालचाली सुरू केल्या असल्या तरी जोवर निर्णय होत नाही, तोवर सरकारची प्रामाणिकता स्पष्ट होणार नाही, याकडे विखे पाटील यांनी आयोगाच्या सदस्यांचे लक्ष वेधले. 

सकारात्मक सर्वेक्षण होईल की नाही, अशी शंका 
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी शासनाने सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला. मात्र सर्वेक्षणाचे काम संघाशी निगडीत संस्थांना देण्याचा निर्णय झाला. संघाची मूळ विचारधाराच आरक्षण विरोधी असल्याने या निर्णयाला आपण यापुर्वीच विरोध केला आहे. मुळातच ज्यांची आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट नाही, त्यांच्याकडून मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सकारात्मक सर्वेक्षण होईल की नाही, अशी शंका विरोधी पक्षनेते ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी आयोगापुढे उपस्थित केली. हे सर्वेक्षण टाटा इ्स्टिटट्यूट, गोखले इ्स्टिटटय़ूट सारख्या नामवंत संस्थाच्या माध्यमातून होणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.