आदिवासी तरूणाचा खून,मृतदेह कपड्यात गुंडाळून ठेवत मारेकरी पसार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- लाकडापासून कोळसा पाडणाऱ्या विष्णू पवार (४०) या आदिवासी तरुणाचा केंदळ खुर्द येथे खून झाला. मृतदेह कपड्यात गुंडाळून ठेवत मारेकरी पसार झाले. तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष धोंडीराम आढाव यांच्या पडीक क्षेत्रात विष्णूचा मृतदेह आढळला.


मृतदेह ठेवला ताडपत्रीच्या झोपडीत गुंडाळून !
मंगळवारी दुपारी घटनेची माहिती ठेकेदार भाउराव राठोड (तिसगाव, ता. पाथर्डी) यांना समजली. पोलिस पाटील प्रल्हाद तारडे यांनी घटनास्थळी भेट दिली. ताडपत्रीच्या झोपडीत मृतदेह गुंडाळून ठेवण्यात आल्याने दुर्गंधी सुटली होती. विष्णूसह इतर १० ते १२ महिला-पुरुष लाकडी कोळसा तयार करण्यासाठी तीन महिन्यांपूर्वी तेथे आले होते. 

आमच्याच लोकांकडून घात होणार !
विष्णूबरोबर पत्नी व ५-६ वर्षांची मुलगी होती. हे सर्वजण लोणवळा येथील होते. भाऊराव राठोड (तिसगाव) यांनी कोळसा तयार करण्यासाठी त्यांना आणले होते. पोलिस पथक आरोपींच्या शोधासाठी रवाना झाले आहे. विष्णूची पत्नी, मुलगी व मेहुणाही पसार झाले आहेत. आमच्याच लोकांकडून घात होणार असल्याचे विष्णूने ठेकेदाराला सांगितले होते. घटना दोन-तीन दिवसांपूर्वी घडली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Blogger द्वारा समर्थित.