विरोधी पक्षनेत्याच्या मतदारसंघातील ग्रामसभेत महाराष्ट्र दिनी राडा!

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महाराष्ट्र दिनाच्या ग्रामसभेत लोणी खुर्द गावात दोन गटांत राडा होऊन तणाव निर्माण झाला. दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्यादी दाखल केल्याने पोलिसांनी दोन्ही गटांच्या प्रत्येकी चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिसांच्या मध्यस्थीने वादावर तात्पुरता पडदा पडला आहे. सरपंच मनीषा आहेर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामदैवत लोमेश्वर मंदिरात सकाळी ग्रामसभा सुरु झाली. श्रीकांत मापारी यांनी ऐनवेळाच्या विषयात ग्रामपंचायतीच्या सभागृहाला माजी आमदार चंद्रभान घोगरे यांचे नाव देण्याचा ठराव मांडला. शरद आहेर यांनी अनुमोदन दिले आणि राड्याला सुरुवात झाली. 

ग्रामविकास अधीकारी यांनी लोणी पोलिसांकडे दिली फिर्याद.
याबाबत ग्रामविकास अधीकारी संतोष थिगळे यांनी लोणी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, अध्यक्षांची परवानगी न घेता ठराव मांडून तो मंजूर झाला व त्याची इतिवृत्तात नोंद करावी, म्हणून श्रीकांत मापरी व इतर तेरा जणांनी सभेचे कामकाज बंद पाडून गोंधळ घातला. मला धक्काबुक्की केली. पोलिसांनी एकनाथ चंद्रभान घोगरे, जनार्धन चंद्रभान घोगरे,शरद बाबासाहेब आहेर,श्रीकांत तान्हाजी मापारी,अमोल भानुदास घोगरे,राधु कचरू राऊत,अनिल बाळासाहेब आहेर,गौतम दिलीप आहेर,संजय कुशीनाथ आहेर,तान्हाजी नामदेव मापारी,जालिंदर एकनाथ मापारी,महेश दिलीप आहेर,अशोक पाटीलबा आहेर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

दुसऱ्या गटानेही दिली पोलिसांकडे फिर्याद. 
दुसर्या गटाचे श्रीकांत मापारी यांनी फिर्यादीत म्हटले आहे की,ग्रामविकास अधिकारी संतोष थिगळे,सरपंच मनीषा आहेर,बाबासाहेब रामराव आहेर,शांतीनाथ एकनाथ आहेर,वसंत अण्णासाहेब आहेर,पोपट व्यंकट आहेर,सचिन बबन आहेर,कारभारी भाऊसाहेब आहेर,रायभान शिवराम आहेर,संजय सोपान आहेर,दादासाहेब चंद्रभान घोगरे,रामनाथ रेवजी आहेर,गोरक्ष शंकर मापारी,हरिभाऊ रामराव आहेर यांनी ग्रामसभेत गोंधळ घातला.जाणूनबुजून व्हिडीओ चित्रीकरण करण्याच्यावेळी अर्वाच्च भाषा वापरून शिवीगाळ केली. 

घटनेमुळे गावात तणावाचे वातावरण.
या घटनेचे गावात तीव्र पडसाद उमटले. तणावाचे वातावरण निर्माण झाले. बुधवारी आठवडे बाजार होता.एका गटाने निषेध सभा ठेवली, तर दुसऱ्या गटाने गाव बंदची हाक दिल्याची चर्चा गावात सुरु झाली. सकाळी एका गटाची निषेध सभा सुरू होण्याच्या तयारीत असताना दुसऱ्या गटाने त्यावर आक्षेप घेत विरोध केला. पोलिसांना याची माहिती असल्याने स्वतः शिर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सागर पाटील, निरीक्षक बाळकृष्ण कदम, सहायक पोलिस निरीक्षक रणजित गलांडे, नायब तहसीलदार अभिजित बारवकर घटना स्थळी उपस्थित झाले.

विनयभंगाचाही गुन्हा दाखल. 
ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी महिलेने पोलिसांकडे आणखी एक फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, आबासाहेब जनार्धन आहेर, एकनाथ चंद्रभान घोगरे, जनार्धन चंद्रभान घोगरे, शरद बाबासाहेब आहेर, श्रीकांत तान्हाजी मापारी, गौतम दिलीप आहेर यांनी ग्रामसभेच्यावेळी शिवीगाळ करून विनयभंग केला. त्यावरून वरील सहा जणांवर गुन्हा दाखल केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.