नेवासे तालुक्यात फरार आरोपीस कट्ट्यासह अटक

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- एका फरार आरोपीस कट्ट्यासह अटक करण्यात आली. पोलिस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून मंगळवारी रात्री गस्त घालत असताना खलवाडी भागात पवार यांच्या घरात झडती घेतली असता सचिन ऊर्फ गटण्या राजेंद्र पवार याच्याजवळ देशी बनावटीचे सुमारे चाळीस हजार रुपये किमतीचे पिस्तूल सापडले. 


मागील एका गुन्ह्यात सचिन पवार फरार झाला होता. पोलिस संदीप संजय दरदले यांनी फिर्याद दिली आहे त्या वरून सचिन पवार यांच्या विरुद्ध आर्म अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल केला. निरीक्षक प्रवीण लोखंडे, उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे, पोलीस बाबा लबडे, विठ्ठल गायकवाड, तुळशीराम गिते, हनुमंत गर्जे, संदीप दरदले यांनी ही कारवाई केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.