दारूच्या नशेत पत्नीचा खून करणार्या आरोपीस अटक


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर तालुक्यातील खडकवाडी बोरवाक येथील तुळसा बाई भाऊसाहेब चिकणे या २९ वर्षीय महिलेच्या डोक्यात दगड घालुन खुन करणारा दारूडा आरोपी भाऊसाहेब चंदर चिकणेला पोलिसांनी अटक केली आहे.कुरुंद येथील दरा याठिकाणी नातेवाईकांच्या घरी केली हा आरोपी पोलिसांना सापडला 

जिल्हा पोलिस अधिक्षक मनिष कलवानिया पोलिस निरीक्षक हनुमंतराव गाडे पो.उप.नि.राजेंद्र पवार पो.काॅ.महेश आव्हाड अरविंद भिंगारदिवे यापथकाने आरोपीचा शोध घेतला असून मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपीने दारूच्या व्यसनातुन या महिलेचा खुन करण्यात आला होता.

भाऊसाहेब चंदर हा बाभुळवाडे येथील रहिवासी असून, १० वषांर्पूर्वी त्याचे तुळसाबाईशी लग्न झाले होते. त्यांना दोन मुले असून, मोलमजुरी करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. आरोपी भाऊसाहेब चिकणे याला दारूचे व्यसन असल्याने तो पत्नीला वारंवार मारहाण करत असे. यामुळे वर्षभरापासून मयत तुळसाबाई ही खडकवाडी येथील बोरवाक येथे आपल्या वडिलांच्या शेजारी झोपडी करून राहत होती.

                                                 --------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 
----------------------------
 
Powered by Blogger.