बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे यांना अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड तालुक्यातील चौंडी येथील अहिल्यादेवी होळकर जयंती कार्यक्रमात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या समोरच आज धनगर आरक्षण मुद्द्यावरून गोंधळ घालण्यात आला आहे, धनगर आरक्षणाच्या मागणीसंबंधी स्टेजसमोर घोषणा देणारे बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे यांना पोलिसांनी अटक केली आहे.

भाजप सरकार सत्तेत येऊन साडे तीन वर्ष होवून गेले तरी धनगर आरक्षणाच्या दिशेनं कोणतंही पाऊल उचलले जात नाही. यामुळे संतप्त लोकांनी आज सरकारचा निषेध करत लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्या कार्यक्रमात गोंधळ घातला.
सत्ता आल्यानंतर वर्षभरात धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपा सरकारने गेली चार वर्षे ‘टिस’च्या (टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायसेन्स) अहवालाचा संदर्भ देत वेळकाढूपणा केल्याने राज्यभरातील धनगर समाज संतप्त झाला आहे.

                                                  --------------------------------

अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 
----------------------------

Powered by Blogger.