चौंडीत राडा ! पालकमंत्री राम शिंदेंचे भाषण सुरु होताच विरोधात घोषणाबाजी,दोघे ताब्यात.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :धनगर आरक्षणाच्या वादातून चौंडीत राडा झाला आहे, भाजप सरकार सत्तेत येवूनही धनगर आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असल्याने त्याचे जोरदार पडसाद आजच्या कार्यक्रमात उमटले आहेत,भाजप आणि पालकमंत्री राम शिंदे यांच्याविरोधात घोषणाबाजी यावेळी विरोधकांनी केली.


लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्याच समोर हा सर्व प्रकार घडला आहे.यावेळी धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी कार्यकर्त्यानी घोषणा देत गोंधळ घातला. संतप्त कार्यकर्त्यानी यावेळी पोलिसांवरही दगडफेक केल्याची माहिती मिळत आहे,२ तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.