चारित्र्याचा संशय घेत पत्नी व मित्राचा खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेप


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- चारित्र्याचा संशय घेत पत्नी व मित्राचा खून केल्याप्रकरणी आरोपी सादिक शाबाश शेख (४९, सदाफुले वस्ती) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. जी. मोहिते यांनी आजन्म करावास व पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अनिल सरोदे यांनी काम पाहिले.

आरोपी सादिक हा दुसरी पत्नी महेमुदा हिच्यासह मुंबईत रहात होता. पहिली पत्नी गुलशनबी हिने सादिकच्या विरोधात मुंबई पोर्ट ट्रस्टकडे तक्रार केली होती. त्याबाबत तडजोड करण्यासाठी सादिक पहिली पत्नी महेमुदा व मित्र सईद यांच्यासह १९ सप्टेबर २०१५ रोजी गुलशनबी हिच्या जामखेड येथील घरी आला. पहिली पत्नी महेमुदा व मित्र सईद यांचे अनैतिक संबंध असल्याचा सादिकला संशय होता.

त्याने त्या रात्री महेमुदा व सईदला दारू पाजली. रात्री झोपेत असताना महेमुदा हिची डोक्यात दगड टाकून, तर सईदची सत्तूरने वार करत हत्या केली. दोघांचे मृतदेह घराबाहेर टाकून पोबारा केला. याप्रकरणी शकील शेख यांच्या फिर्यादीवरून जामखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपासी अधिकारी बी. जे. हनपुडे यांनी न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. 

सादिक यानेच हा गुन्हा केला असल्याबाबतचे परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी पूर्ण करून भक्कम पुरावा सादर करण्यात आला. पुरावे ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी सादिकला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे अॅड. अनिल सरोदे यांनी काम पाहिले. याकामी न्यायालयाचे पैरवी अधिकारी एसआय दिलीप भोसले यांनी सहकार्य केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.