बोलेरो पिकअप चोरीचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर शहरातील मालदाड रोडवर असणाऱ्या तिरंगा चौक येथील एका जणाची बोलेरो पिकअप गाडीला बनावट चावीने उघडून चोरुन नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन जणांना पाठलाग करुन पकडल्याची घटना मंगळवार दि. २९ रोजी, रात्री १ वाजेच्या सुमारास घडली आहे. या दोघांना संगमनेर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. 


याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तिरंगा चौक याठिकाणी संतोष दामु गायकवाड हे आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. नेहमीप्रमाणे त्यांनी सोमवारी रात्री बोलेरो पिकअप क्रमांक एमएच १७ बीवाय ०९७६ ही घरासमोर लावली होती.

मंगळवारी रात्री एक वाजेच्या सुमारास मोहम्मद उर्फ खालीफ निजामुद्दीन अन्सारी (वय-२४, रा.बेडका गाव, ता.काठी,जि.मुझ्झफर,राज्य.बिहार) व मुबारक अब्दुल कलाम हुसेन अन्सारी (वय-२६, रा.हरपुर मच्छगर, जि.कुशीनगर, पो.ऑ.बॉडर्वार, रा.उत्तरप्रदेश, ह.मुक्काम कसारा,ता.संगमनेर) या दोघांनी बनावट चावीने पिकअप गाडी उघडून चोरुन नेण्याचा प्रयत्न केला असता संतोष गायकवाड व त्याच्या साथीदाराने या दोघांचा पाठलाग करुन पकडले.

--------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून.
----------------------------
Powered by Blogger.