राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राज्याचे कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे पहाटे हृद्यविकाराच्या झटक्याने निधनझाले.पहाटे 4 वाजून 35 मिनिटांनी ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळतेय.


पांडुरंग तथा भाऊसाहेब पुंडलिक फुंडकर हे भाजपाचे उमेदवार म्हणून नवव्या, दहाव्या आणि अकराव्या लोकसभेत महाराष्ट्र राज्यातील अकोला लोकसभा मतदारसंघातून निवडून आले. पांडुरंग फुंडकर हे भाजपाचे प्रदेशाध्यक्षही होते. एकनाथ खडसे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस मंत्रीमंडळात त्यांना कृषीमंत्रीपद देण्यात आलं होतं. पांडुरंग फुंडकर यांच्या राजकीय कारकिर्दीला जनसंघापासून प्रारंभ झाला. आणीबाणीविरोधी आंदोलनात त्यांनी सक्रीय सहभाग घेतला. त्यामुळे त्यामुळे तुरुंगात जावे लागले. पुढे त्यांनी भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळले. त्यांनी कापसाच्या दरासाठी खामगाव ते आमगाव अशी पदयात्रा काढली होती.

अकोला लोकसभा मतदारसंघातून ते लोकसभेवर निवडले गेले. राजीव गांधींच्या हत्येमुळे काँग्रेसची प्रचंड लाट असतानाही पुढील निवडणुकीतही अकोला लोकसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळविला होता. यानंतर युती सरकारच्या काळात कापूस पणन महासंघाच्या मुख्य प्रशासकपदी नेमणूक झाली. त्याच काळात भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते सतत ३ वर्षे कार्यरत होते. त्यांनंतर त्यांची विधान परिषदेवर नियुक्‍ती झाली आणि विरोधी पक्षनेते पद मिळाले. उत्कृष्ट संसदपटू हा पुरस्कार देखील फुंडकर यांना मिळाला आहे.
                                                   --------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून. 
----------------------------
Powered by Blogger.