संभाजी भिडेच्या अटकेसाठी राहुरीतील तरुणाचा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे प्रमुख संभाजी भिडे गुरुजी यांना अटक करावी, या मागणीसाठी बुधवारी मंत्रालयासमोर एका तरुणाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. या वेळी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्याला लगेच ताब्यात घेतले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. 



तो तरुण अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीचा. 
गणेश पवार असे या तरुणाचे नाव असून तो अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील आहे. कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे यांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी करत गणेश दुपारी एकच्या सुमारास मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आला. मंत्रालयाच्या प्रवेशद्वाराजवळ घोषणा देत त्याने अंगावर राॅकेल ओतून घेतले. हा प्रकार तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांनी बघितला आणि त्यांनी तातडीने गणेशला ताब्यात घेतले.

गणेश पवार  रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता ?
मंत्रालयात दुपारी दोननंतर प्रवेशपत्रे दिली जातात. प्रवेशपत्र काढण्यासाठी येथे मोठी रांग असताना हा प्रकार घडला. गोंधळानंतर येथे मोठी गर्दी झाली होती. पवार हा आनंदराज आंबेडकर अध्यक्ष असलेल्या रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येते. कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी रोजी दोन गटांत झालेल्या वादातून हिंसाचार झाला होता. हिंसाचारात वाहनांची तोडफोड तसेच वाहने पेटवून देण्यात आली होती.

संभाजी भिडेना अद्याप अटक नाहीच ?
दंगल घडवणे, अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत मिलिंद एकबोटे आणि शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात एकबोटे यांना अटक झाली होती. त्यांना जामीनही मिळाला आहे. मात्र, संभाजी भिडे गुरुजी यांना अद्याप अटक झालेली नाही. तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.