कर्जबाजारीपणाला कंटाळून महाराष्ट्र दिनी शेतकऱ्याची आत्महत्या


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कर्जबाजारीपणाला कंटाळून नगर तालुक्यातील राळेगण म्हसोबा येथील रावसाहेब दशरथ कचरे (वय ३८) या शेतकऱ्याने मंगळवारी महाराष्ट्र दिनी शेतातील झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. या शेतकऱ्यावर सोसायटीचे १ लाखाचे कर्ज होते. राज्य शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ त्यांना मिळाला नव्हता.

या नैराश्यातून कचरे यांनी आत्महत्या केली. कचरे यांना ५ एकर शेती होती. सोसायटी, तसेच खासगी सावकाराचे त्यांच्यावर कर्ज होते. ते फेडण्यासाठी त्यांनी नुकतीच अर्धा एकर शेती विकली होती. मात्र, या पैशांतून सर्व कर्ज फिटले नाही. शेतीमध्ये उत्पादित केलेल्या मालास योग्य भाव मिळत नसल्याने त्यांना नैराश्याने ग्रासले होते.

या नैराश्यनेतून कचरे यांनी १ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास शेतातील कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेत जीवनयात्रा संपवली. त्यांच्यामागे पत्नी व दोन लहान मुली आहेत. याप्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.