जामखेड हत्याकांडातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी - अजित पवार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णत: ढासळली आहे. पालकमंत्री राम शिंदेंच्या तालुक्यात दिवसा गोळ्या घालून माणसे मारली जातात, तरीदेखील त्यांना घटनेचे गांभीर्य नाही. घटनेला चार-पाच दिवस झाले, तरी पालकमंत्री पीडित कुटुंबीयांकडे फिरकले नाहीत हे दुर्दैव आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

गोळीबाराच्या घटनेत मृत्यू पावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या पीडित कुटुंबीयांची भेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सायंकाळी दि.२ मे रोजी घेतली. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. अतिशय क्रूरपणे हे दुहेरी हत्याकांड घडल्याने या घटनेतील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा व्हावी. हा तपास सीआयडीकडे द्यावा.पीडित कुटुंबीयांच्या सदस्याला राष्ट्रवादीतर्फे संस्थेत नोकरी देण्यात येईल. तसेच आर्थिक मदतही करण्यात येईल.

सध्या ग्रामीण भागातही गुंडाच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. तालुक्यातील वाकी येथील गोळीबाराच्या प्रकरणातील आरोपींना अटक केली असती. तर ही घटना घडलीच नसती.अपराध करणारे राजरोस पणे बाहेर फिरत आहेत. तर निरापराधांना आत टाकलं जात आहे. अशी टीका देखील पवार यांनी पोलीस प्रशासनावर केली. दुहेरी हत्याकांडात कोणी राजकीय हस्तक्षेप करु नये म्हणुन आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.