जामखेड दुहेरी हत्यांकाडाचा तपास लावण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड येथील दुहेरी हत्यांकाडाच्या घटनेचा तपास लावण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती केली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक रंजनकुमार शर्मा यांनी दिली. या पथकामध्ये प्रमुख म्हणून अप्पर पोलिस अधिक्षक धनशाम पाटील व त्यांच्या मदतीसाठी तपास अधिकारी म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक पाडुरंग पवार, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, जामखेडचे पोलीस निरिक्षक नितीन पगार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, केडगाव दुहेरी हत्याकांड व उद्योजक बाळासाहेब पवार आत्महत्या प्रकरणानंतर आता जामखेड दुहेरी हत्याकांडाच्या तपासासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.