जामखेडमध्ये जुगार अड्डयावर छापा,पाच जणांना अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड तालुक्यातील पाडळी फाटा येथे जुगार खेळत असताना जामखेड पोलिसांनी छापा टाकून चौदा हजार रुपयांचा ऐवज मिळुन आला तर या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले होते.

जामखेडला नव्यानेच हजर झालेले पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी जामखेड तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्व अवैध धंद्याला चाप लावण्यासाठी सुरूवातीला अवैध दारू व हातभट्टीवरील धाडसत्र सुरू करण्यात आले होते. 

त्यानंतर दि. २९ रोजी जुगार खेळणाऱ्यावर छापे टाकायला सुरुवात केली आहे. आज पहिली धडक कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता जामखेड तालुक्यातील अवैध धंदे वाल्यांचा कर्दनकाळ ठरणाऱ्या पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या कारवाईमुळे संपूर्ण तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.