वाढदिवसाचे औचित्य साधून दिगंबर ढवण १ जूनला भूमिका करणार जाहीर


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :शिवसेनेचे दक्षिण जिल्हा उपप्रमुख दिगंबर ढवण यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याचाच जवळजवळ निर्णय घेतला असून, ते आता १ जून ला त्यांची भूमिका जाहीर करणार असल्याने याकडे नगर शहराच्या राजकिय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दिगंबर ढवण कोणत्या पक्षात जाणार, की स्वतंत्र सावतासुभा निर्माण करणार ? अशीच चर्चा शहरातील राजकिय वर्तुळात आहे. 

दिगंबर ढवण यांचा १ जूनला वाढदिवस असून, वाढदिवसाचे औचित्य साधून ते त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे समजते. याच दिवशी मोठे शक्तिप्रदर्शनही दिगंबर ढवण करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. दिगंबर ढवण व महापौर सुरेखाताई कदम, माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदाररित्या आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.