गावठी कट्ट्याचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी,गुन्हा दाखल.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :फैरोज रहीम शेख यांना रविवारी (दि. २७) रात्री १० वाजण्याच्या सुमारास वसंत टेकडी परिसरात पत्नीसह दुचाकीवरून जात असताना अडवून गावठी कट्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. 


याप्रकरणी शेख यांच्या फिर्यादीवरुन भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, सय्यद समज अय्याज, सय्यद रियाज अय्याज व इतर चार जणांनी शेख हे पत्नीसोबत वसंत टेकडी येथून घरी जात असताना त्यांना रस्त्यात अडवून शिवीगाळ केली. तसेच आमच्या विरोधात अर्ज का करतो असे म्हणत गावठी कट्याचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली.

यावेळी आरोपींनी शेख यांच्या खिशातील ५ हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली. शेख यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरुन भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोसई कवडे हे करत आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------




Powered by Blogger.