सेनेतील पक्षांतर्गत खदखद चव्हाट्यावर, ढवण व कदम यांच्यातील वाद मिटण्याची शक्यता मावळली.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कदम-ढवण यांच्यातील वाद मिटण्याऐवजी विकोपाला गेला आहे. शिवसेनेचे उपनेते तथा माजी आमदार अनिलभैय्या राठोड, संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर, दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी ढवण व कदम यांच्यातील वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो प्रयत्न असफल ठरला. 

ढवण यांना उपजिल्हाप्रमुख पदावरुन कार्यमुक्त करण्यात आले. तद्नंतर ढवण यांनी स्वत:चा त्याचप्रमाणे त्यांच्या पत्नी शारदा ढवण यांच्या नगरसेविका पदाचा राजीनामाही दिला आहे. सौ.ढवण यांचा राजीनामा अद्यापही मंजूर झाला नसला तरी ढवण व कदम यांच्यातील वाक्युद्ध सुरुच आहे.

श्री.ढवण यांची समजूत काढण्याचा प्रयत्नही सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला मात्र ढवण हे स्वत:च्या भूमिकेशी ठाम असून, ते महापौर सुरेखाताई कदम व संभाजी कदम यांच्या कारभारावर टिकेची तोडही डागत आहेत. ढवण यांच्या आरोपाचा कदम यांच्याकडूनही खरपूस शब्दात समाचार घेतला जात आहे.

एकंदरित शिवसेनेतील पक्षांतर्गत खदखद चव्हाट्यावर आली असून, ढवण व कदम यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. उभयंतांमधील वाद मिटण्याची शक्यता मावळली असून, आता दिगंबर ढवण यांच्या १ जूनच्या भूमिकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

----------------------------अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.