महिलेच्या विनयभंगप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्याच्या पठार भागावरील सावरगाव घुले परिसरातील बेलसोंडे येथील एका महिलेचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी (दि. २९) दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बेलसोंडे वाडी याठिकाणी ही महिला आपल्या कुटुंबा सोबत राहत आहे. मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास महिला घरी एकटी असतांना भानुदास मारुती घुले व देवराम रानू घुले या दोघांनी घरात घुसून महिलेशी लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

महिलेचा मुलगा सोडवण्यासाठी आला असता रामदास मारुती घुले याने त्याला दगड मारला. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन घारगाव पोलिसांनी वरील तिघांविरुद्ध गु.र.नं. ७६/२०१८ भादवि कलम ३५४, ३५४ (ब), ४५२, ३३७, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.