पारनेर तालुक्यातील चोंभूतमध्ये बिबट्या आढळल्याने परिसरात घबराट.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :बिबटयाने केलेल्या हल्ल्यात चोंभूत (ता. पारनेर) येथील गौतमनगर वस्तीवरील शेतकरी दत्तात्रय कोंडीबा कोल्हे यांचा जर्मन शेफर्ड जातीचा पाळीव कुत्रा ज़खमी झाला. हा प्रकार सोमवार, दि. २८ रोजी संध्याकाळी साडे सातच्या दरम्यान घडला. 

याबाबतची माहिती अशी की, सोमवार, दि. २८ रोजी संध्याकाळी साडे सातच्या दरम्यान शेतकरी कोल्हे हे नांगरणीचे काम करत होते. याचवेळी उसाच्या शेतातून आलेल्या बिबट्याने त्यांच्या सोबत शेतात आलेल्या जर्मन शेफर्ड जातीच्या पाळीव कुत्र्यावर हल्ला चढवून जखमी केले. कुत्र्याचा ओरडण्याचा आवाज आल्याने कोल्हे यांनी स्वत:चा बचाव करत घराकडे धाव घेतली.

दरम्यान, एका तासाने वस्तीवरील संतोष खाडे, ग्रापं. सदस्य नितीन भालेराव, अमोल गुंजाळ, बाबासाहेब गुंजाळ, स्वप्नील भालेराव, विठ्ठल म्हस्के या युवकांनी उसाच्या बाजूला बॅटरीच्या सहाय्याने पाहिले असता, त्यांना पुन्हा त्या बिबट्याचे दर्शन झाले. यामुळे परिसरात घबराचे वातावरण निर्माण झाले आहे. 

दत्तात्रय कोल्हे यांनी पारनेर येथील वनरक्षक यांना संपर्क साधून येथेतत्काळ पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. दरम्यान, जखमी कुत्र्यावर सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रवीण भालेराव यांनी उपचार केले. उन्हाळा असल्याने वस्तीवरील लोक अंगणामध्ये झोपतात.

शिवाय विजेचा लपंडाव सुरू असल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री कधीही जावे लागते. यामुळे वनविभागाने तातडीने पिज़रा लावून बिबटयाचा बंदोबस्त करण्याची मागणी चोंभूत ग्रामस्थांनी केली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.