विशाल कोतकरला ४ मे पर्यंत पोलिस कोठडी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव येथील दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी नगरसेवक विशाल कोतकर व रवि खोल्लम यांना न्यायालयासमोर हजर केले असता विशाल कोतकरला दि. ४ मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली तर आरोपी रवि खोल्लम याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. 

दि. ७ एप्रिल रोजी केडगाव येथे शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची गोळ्या घालून व सत्तुरने गळा चिरून निघृर्ण हत्या करण्यात आली. या गुन्ह्यातील आरोपी नगरसेवक विशाल कोतकर व रवि खोल्लम यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्यांना बुधवारी (दि. २) न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी सरकार पक्षातर्फे जोरदार युक्तीवाद करण्यात आला. 

तपासी अधिकारी शरद गोर्डे यांनी न्यायालयात सांगीतले की, जामखेड येथील घटनेमुळे पोलिस बंदोबस्त असल्याने या गुन्ह्यात तपास करण्यास वेळ मिळाला नाही. या गुन्ह्यातील आरोपी विशाल कोतकर याने घटनेपूर्वी व घटनेनंतर कोणाकोणाला फोन केले याचा तपास करावयाचा आहे. तसेच या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास करावयाचा आहे. त्यामुळे पोलिस कोठडी मिळण्याची विनंती केली. न्यायालयाने विशाल कोतकर याला दि. ४ मे पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला तर रवि खोल्लम याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.