लोकसभा अध्यक्षा महाजन यांच्या उपस्थितीत अहिल्याबाई होळकर जयंती साजरी होणार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जामखेड तालुक्यातील चौंडी येथे दि. 31 मे रोजी होणाऱ्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी चौंडी येथे शासकीय जयंतीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमस्थळाची काल पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी पाहणी केली. या जयंती कार्यक्रमास लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या जयंती उत्सवाचे स्वागताध्यक्ष व राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नववे वंशज पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी काल कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. या वेळी भाजपा तालुकाध्यक्ष व पंचायत समितीचे सदस्य रवी दादा सुरवसे, माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ. भगवानराव (दादा) मुरूमकर, जि.प. सदस्य सोमनाथ पाचरणे, पणन संचालक पांडुरंग उबाळे,भाजपा युवानेते व पिंपरखेडचे सरपंच बापूराव ढवळे, धामणगावचे सरपंच महारुद्र महारनवर, डॉ. बोराटे, शरद हजारे, बाळासाहेब भोसले, चोंडीचे सरपंच अभिमान सोनवणे, सरचिटणीस लहू शिंदे, हरी मुरूमकर, रामभाऊ मुरूमकर, तुकाराम लबडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.