16 दिवसांनंतर पेट्रोल आणि डीझेल झाले स्वस्त !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :गेल्या 16 दिवसांपासून गगणाला भिडलेले पेट्रोल आणि डिझेचे भाव आता कमी झाले आहेत,पेट्रोल आणि डिझेल दोन्ही ५९ पैशांनी स्वस्त झालं आहे.16 दिवसांनंतर फक्त 59 पैशांनी पेट्रोल झालं स्वस्त झाले आहे. पण गेले १६ दिवस इंधनदरात सलग दरवाढ होत होती. त्यातच आता सामान्यांना थोडा का होईना, दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, रोज वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीने सर्वसामान्य हैराण झालेत. यावर उपाय म्हणून सरकारने इंधनाचे वायदे बाजारात व्यवहार सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. 

म्हणजे आपल्याला महिनाभरानंतर लागणारे इंधन आजच्या भावात खरेदी करून ठेवता येणार आहे. त्यामुळे दरवाढ झाल्यास त्याचा फटका बसणार नाही. वाढत्या दरांना नियंत्रणात आणण्यासाठी हे व्यवहार इंडियन कमोडिटी एक्स्चेंजमध्ये करण्यास पेट्रोलियम मंत्रालयाने हिरवा कंदील दिला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.