माजी आमदार राठोड स्वार्थासाठी कोणत्याही थराला जातील,पिता-पुत्रांकडून जीवाला धोका - शिवभक्त येंडे.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :केडगाव येथील दुहेरी हत्याकांडात मयत झालेल्या संजय कोतकर यांच्या पत्नीस शिवसेनेने विधानसभेची उमेदवारी देण्याची मागणी केलेलं श्रीराम येंडे यांना राजेश शिंदे नामक व्यक्तीने फोन करुन धमकी दिल्याची घटना घडली असून याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, राजेश शिंदे नामक शिवसैनिकाने श्रीराम येंडे हे एकवीरा चौकातील दुकानात असताना सोमवारी (दि. २८) रात्री सव्वाआठच्या सुमारास फोन करुन तुझे दुकान कुठे आहे. तु फार माजला आहे. तुझ्याकडे पहावं लागेल असे म्हणत धमकी दिली.

अनिल राठोड व विक्रम राठोड यांच्याकडून आपल्या जीवास धोका असल्याचे निवेदन येंडे यांनी पोलिसांना दिले आहे. कोतकर यांच्या पत्नीस उमेदवारी देण्याची मागणी केल्याचा राग आल्याने राठोड आपल्यावर आरोप करत आहेत. कार्यकर्ते धमकी देत आहेत. राठोड हे स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. 

माझ्या कुटुंबाला राठोड व त्यांचा मुलगा विक्रमकडून धोका आहे. काही बरेवाईट झाल्यास त्याची जबाबदारी राठोड पिता पुत्रांवरच असेेल, असे येंडे यांनी निवेदनात म्हटले आहे. याप्रकरणी येंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिस प्रशासन पुढील तपास करत आहेत.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.